भन्नाट फोटोंसाठी कायपण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 07:25 PM2018-06-13T19:25:08+5:302018-06-13T19:26:01+5:30

एखादा फोटोग्राफर चांगला मित्र असला की त्याचा मित्रपरिवार त्याचा चांगलाच फायदा उठवतात. त्यातही तो फोटोग्राफर उपलब्ध गोष्टींचा सुंदर वापर करणारा असला, तर मग काय, सोने पे सुहागा !

असा जबरदस्त फेसबुक, व्हॉट्सअॅप डीपी कोणाला आवडणार नाही? पण त्यासाठी फोटोग्राफर तसा जबरदस्त हवा. या फोटोसाठी फोटोग्राफरनं घेतलेले कष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

ज्वालामुखीचा हा फोटो पाहून फोटोग्राफरची कमाल वाटेल. मात्र हा ज्वालामुखी होममेड म्हणजे अगदी घरातल्या घरात तयार करण्यात आला आहे. फोटोग्राफरच्या या कौशल्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे.

फोटोग्राफर जसा मोठमोठ्या डोंगरदऱ्यांना कॅमेऱ्यात कैद करु शकतो, तसा तो छोट्या वस्तूंना मोठंही करु शकतो. फक्त फोटोग्राफरची नजर तशी असायला हवी.

हटके फोटोंसाठी कोणी काय करेल, हे सांगणं तसं अवघडच. आपल्याला हवा तसा फोटो मिळावा, यासाठी फोटोग्राफर उपलब्ध गोष्टींचा कसा वापर करतात, हेच या फोटोतून दिसून येतं.