जमिनीखाली असलेलं 'हे' अनोखं गाव पाहण्यासाठी दरवर्षी येतात 55 लाख पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:13 PM2018-12-18T15:13:18+5:302018-12-18T15:30:45+5:30

अमेरिकेच्या ग्रँड कॅनियनच्या जवळ असलेल्या हवासू कॅनियनमध्ये सुपाई नावाचं एक सुंदर गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीपासून जवळपास 3 हजार फूट खाली आहे.

सुपाई हे अनोखं गाव पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येत असतात. दरवर्षी जवळपास 55 लाख पर्यटक या गावाला भेट देतात.

सुपाई हे गाव एका खोल दरीत वसले असून या गावाची लोकसंख्या जवळपास 200 इतकी आहे.

जमिनीच्या खाली असलेल्या या गावात जाण्याचा मार्ग ही थोडा खडतर आहे. सुपाई या गावात जाण्यासाठी अनेक लोक पायी जाण्याचा मार्ग स्वीकारतात.

सुपाई या गावामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रामुख्याने खेचरांचा वापर केला जातो.

हेलिकॉप्टरच्या मदतीने ही या गावात जाता येते. मात्र त्यासाठी येणारा खर्च हा तुलनेने अधिक आहे.

गावामध्ये पोस्ट ऑफीस, चर्च, शाळा आणि कॅफे आहेत. तसेच खेचरांच्या मदतीने पत्र पाठवली जातात. हे सुंदर गाव पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.