लांडग्यांमुळे पेंग्विन्सना वाढला होता धोका, कुत्र्यांनी असा वाचवला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:42 PM2018-09-12T15:42:04+5:302018-09-12T15:50:47+5:30

कुत्रा हा किती इमानदार प्राणी आहे हे काही वेगळं सांगायला नको. कुत्र्यांचं आणि मनुष्याचं जवळचं नातं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण ऑस्ट्रेलियात कुत्रा आणि पेंग्विन यांचं अनोखं नातं बघायला मिळालं. इथे काही लांडग्यांपासून कुत्र्यांनी पेंग्विनची रक्षा केलीये. (Image Credit : bondivet.com)

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या मीडिल आयलंडवर २००५ दरम्यान ८०० पेंग्विन होते. याच आयलंडवर काही लांडगेही राहत होते. अशात या लांडग्यांना आपलं पोट भरण्यासाठी पेंग्विन्सची शिकार करावी लागत होती. यामुळे पेंग्विन्सची संख्या कमी झाली. (Image Credit : theconversation.com)

ज्या ठिकाणी पोट भरलं जातं अर्थातच त्या ठिकाणी जास्त जनावरं राहतात. माणसांचंही तसंच आहे. जीवन चक्र असंच चालतं. पेंग्विन होते म्हणून लांडग्यांचं पोट भरलं जात होतं. त्यामुळे लांडग्यांची संख्याही वाढली होती. अशात पेंग्विनचं अस्तित्व धोक्यात आलं. (Image Credit : www.allcuteallthetime.com)

जेव्हा पेंग्विनची कमी होणारी संख्या चिंतेचा विषय ठरत होती, तेव्हाच एका शेतकऱ्याला एक आयडिया आली. त्याने पेंग्विनची ही प्रजाती वाचवण्यासाठी या आयलंडवर काही कुत्री घेऊन आला. (Image Credit : www.bbc.com)

पण हे काही सामान्य कुत्री नाहीत. हे एका खास प्रजातीचे कुत्रे आहेत. Maremma हे कुत्रे दिसायला फार सुंदर पण प्रमाणापेक्षा जास्त चपळ आणि सतर्क असतात. तो शेतकरी ही कुत्री आयलंडवर घेऊन आला. (Image Credit : www.earthtouchnews.com)

या कुत्र्यांमुळे पेंग्विनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लांडग्यांना कुत्र्यांचा वास येत असल्याने ते इथे शिकार करण्यासाठी येत नाहीत. कुत्र्यांचं भूंकणंही लांडग्यांना त्रासदायक वाटतं, त्यामुळे ते इथे येत नाहीत.असे सांगितले जात आहे की, ही कुत्री आणल्यानंतर जवळपास २०० पेंग्विनची संख्या वाढली आहे.