हे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:56 PM2018-11-21T14:56:53+5:302018-11-21T15:14:42+5:30

पिग्मी रॅबिट- या सश्याची लांबी 9.25 इंचांपासून 11.6 इंचांपर्यंत असते.

द्वार्फ लँटर्न शार्क: या शार्कची लांबी 8.3 इंच एवढी असते.

पिग्मी मार्मोसेट: हा जगातला सर्वात छोटा माकड आहे. त्याची लांबी अंदाजे 4.6 इंच ते 6.2 इंचांएवढी असते

बारबाडोस थ्रेड स्नेकः या सापाची लांबी जवळपास 4.1 इंच एवढी आहे. हा जगभरातला सर्वात छोटा साप आहे.

माऊस लेमूर- मेडागास्करच्या आयलँडमध्ये आढळणाऱ्या उंदराची लांबी 3.6 इंच असते.

विलियम द्वार्फ गेक्को: हा केवळ 3 इंच(7.6 सेंटीमीटर)लांबीचा असतो. तंजानियामध्ये ही जात आढळते.

बी हुममिंगबर्डः जगातला हा सर्वात छोटा पक्षी आहे, मधुमख्खी हॅमिंगबर्ड, मेलिसुगा हेलेना हा पक्षी 2.2(5.6 सेटींमीटर) लांबीचा असतो.

स्पेकलेड पडलो पैर टॉर्टोइस: पृथ्वीवर हा सर्वात छोट्या प्रजातीचा कासव आहे. हा कासव 2.4-3.1 इंच (6.1-7.9 सेंटीमीटर) एवढा लांब असतो.

बलुचिस्तान पिग्मी जरबोआ: बलुचिस्तान पिग्मी जरबोआच्या शरीराची लांबी 1.7 इंच(4.3 सेंटीमीटर) आहे. जो जगात सर्वात छोटा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हा प्राणी आढळून येतो. कांगारुंच्या प्रजातीत या प्राण्याची गणना केली जाते.

इट्रस्केन श्रेवः याच्या शेपटीची लांबी 1.5 (11.4 सेंटीमीटर) इंच एवढीच असते, भूमध्य क्षेत्रापासून दक्षिणपूर्वी आशियापर्यंतच्या भूमीवर तो आढळतो.

ब्रोकेसिया मायक्राः ब्रोकेसिया मायक्रा केवळ 1 इंच (2.5 सेंटीमीटर) लांब आहे. हा एका बोटाच्या बसेल एवढाच आहे. मेडागास्कर या आयलंडवर तो सापडतो.

व्हर्जिन आयलँड द्वार्फ सफारी: हा केवळ 0.6 इंच(1.5 सेंटीमीटर) लांब आहे.