'रेन्बो व्हॅली'... चीनमधील रंगीबेरंगी डोंगररांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:41 PM2019-06-04T13:41:09+5:302019-06-04T14:31:22+5:30

संपूर्ण डोंगरच इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी ढंगात न्हाऊन निघत असेल तर नवलच. चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिऑग्राफिकल पार्कमध्ये असे रहस्यमयी डोंगर आहेत.

विविध रंगांच्या वाळू आणि खनिजांनी बनलेले हे डोंगर अनेक वर्षांपासून सौंदर्याची भुरळ घालत आहेत. युनेस्कोने या डोंगराचा आपल्या यादीत समावेश केला आहे.

चीनच्या उत्तरेकडील किलियन पर्वतरांगेत हा प्रांत येतो. लिंजे आणि सुनन प्रांतही याच सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या परिसरात पसरला आहे.

चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी 1920 मध्ये हा प्रांत शोधून काढला. या प्रांतात अशा प्रकारचे सौंदर्य वसले असल्याचे यापूर्वी स्थानिकांना माहितच नव्हते.

वाळूचे खडक आणि गाळाच्या सच्छिद्र खडकांपासून हे डोंगर तयार झालेत. लोह आणि मॅगनिज सारखी खनिजं विपूल प्रमाणात आहेत.

शिवाय भूगर्भातल्या झालेल्या हालचालींमुळे डोंगरात वेगवेगळ्या रंगाचे खडकांचे स्तर पाहायला मिळतात.

डेनक्सिया राष्ट्रीय उद्यानाला लिंजे डेनक्सिया सिनिक एरिया असेही म्हटले जाते.