अमेरिकेतील कोलकाता, स्कॉटलंडमधील पाटणा पाहिलंय का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:27 PM2018-10-24T13:27:25+5:302018-10-24T14:21:50+5:30

भारत हा विविधतेने नटलेल्या सुंदर शहरांनी संपन्न असलेला देश आहे. मात्र भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणं ही जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या अनेक देशांमध्ये आहेत. जगभरात अशी अनेक शहर आहेत ज्यांची नाव ही भारतीय शहरांसारखीच आहेत ते जाणून घेऊया.

भारतातील पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता हे शहर अत्यंत सुंदर आहे. मात्र अमेरिकेतही कोलकाता नावाचे एक शहर आहे.

केरळमधील कोच्ची हे प्रसिद्ध ठिकाणं आहे. मात्र जपानमध्ये कोच्ची नावाचं सुंदर ठिकाण असून या दोन्ही ठिकाणी सी-फूड मिळतं.

बिहार राज्याची राजधानी पाटणा आपल्याला माहित आहे. पण स्कॉटलंडमध्येही पाटणा नावाचं एक ठिकाण असून ते अत्यंत शांत आणि कमी लोकसंख्या असलेलं ठिकाण आहे.

लखनौ हे उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. मात्र अमेरिकतही लखनौ नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे.

वडोदरा हे गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर असून गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. मात्र अमेरिकेतही वडोदरा असं प्रसिद्ध ठिकाण आहे.

आंध्र प्रदेशमधील हैदराबाद हे भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. मात्र पाकिस्तानमध्येही हैदराबाद नावाचं एक ठिकाण आहे.