हल्क उचलतो सामान अन् बॅटमन भरतो पाणी; सुपरहिरोंना घरगडी करणाऱ्या भावड्याची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:47 PM2018-09-01T15:47:53+5:302018-09-01T15:54:15+5:30

बॅटमॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका यासारखे सुपरहिरो कोणाला आवडणार नाहीत? मोठा पडदा गाजवणारे हे सुपरहिरो मलेशियातील एका तरुणाकडे चक्क घरकाम करतात.

चित्रपटांमध्ये आपल्या सुपर पावर्सने जगाला वाचवणारे, शत्रूचा सामना करणारे सुपरहिरो मलेशियन तरुणाच्या घरातील सगळी कामं करतात.

मलेशियन तरुणानं ही कमाल केलीय फोटोग्राफीच्या कौशल्यातून. तरुणानं फोटोग्राफी करताना वापरलेल्या अँगल्समुळे प्रत्यक्षात तळहाताएवढे असलेले सुपरहिरो फोटोंमध्ये तरुणाइतके दिसतात.

फोटोग्राफी करताना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ सुपरहिरोला सेट करायचं आणि मग आपण त्या फ्रेममध्ये अॅडजस्ट व्हायचं, असा फंडा तरुणानं वापरला आहे.

या तरुणानं काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण या तरुणाच्या घरी सुपरहिरो सफाईचं काम करतात, माळीकाम करतात, गाडीतून सामान काढतात आणि कपडेदेखील वाळत घालतात.

मलेशियन तरुणाचं घर सुपरहिरोजनी भरलेलं आहे. हा तरुण सुपरहिरोंकडून स्वत:चं चित्रदेखील काढून घेतो.

अप्रतिम फोटोग्राफी कौशल्याच्या जोरावर तरुणानं जबरदस्त फोटो काढले आहेत.

सध्या सोशल मीडियावर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी या फोटोंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.