नववर्षा संबंधित 'या' विचित्र परंपरा तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:27 PM2019-01-01T15:27:09+5:302019-01-01T15:39:17+5:30

वेगवेगळ्या देशातील लोक नव्या वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक बाहेर जेवायला-फिरायला जातात, तर काही लोक आकाशात आतषबाजी करुन नव्या वर्षाचं स्वागत करतात. पण जगातल्या काही ठिकाणांवर नव्या वर्षाचं स्वागत वेगळ्याच पद्धतीने केलं जातं. चला जाणून घेऊ जगभरात नव्या वर्षाबाबत काही अनोख्या परंपरा...

स्वित्झर्लंड - केक आणि आइस्क्रीम खाताना कुणीही काळजीपूर्वक खातात. कारण हे पदार्थ खाली पडले तर तुमचं काम वाढतं. पण स्वित्झर्लंडमध्ये लोक जाणून बुजून खाली केक आणि आइस्क्रीम पाडतात. येथील लोक असं मानतात की, नव्या वर्षानिमित्त आइस्क्रीम खाली पाडल्याने घरात भरभराटी येते. (Image Credit : cloudfront.net)

दक्षिण आफ्रिका- सामान्यपणे घरातील जुनं फर्निचर एकतर भंगारवाल्याला दिलं जातं, नाही तर कचऱ्यात फेकलं जातं. पण दक्षिण आफ्रिकेतील लोक जुन्या फर्निचरचं काय करतात हे वाचून तुम्ही उडालच. येथील लोक घरातील जुनं फर्निचर खिडकीतून बाहेर फेकतात. (Image Credit : seethrumag.com)

डेनमार्क - इथे तर नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्याची पद्धतच वेगळी आहे. इथे शेजाऱ्याच्या घरी जाऊन प्लेट्स तोडण्याची परंपरा आहे. यामागे त्यांनी मान्यता आहे की, दरवाज्यावर जितक्या जास्त तुटलेल्या प्लेट्स असतील, नवीन वर्ष तितकच शुभ जाईल. (Image Credit : pinimg.com)

जपान - मंदिरात तर तुम्ही अनेकदा घंटी वाजवत असाल. कारण घंटीचा आवाज शुभ आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो असं मानलं जातं. याचप्रकारे जपानमध्ये नव्या वर्षानिमित्त घंटा वाजवण्याची प्रथा आहे. इथे लोक १०८ वेळा घंटा वाजवून नव्या वर्षाचं स्वागत कतात. असं केल्याने मनुष्याचे पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. (Image Credit : asiatourist.info)

मेक्सिको - नव्या वर्षाचं स्वागत करण्यात मेक्सिकोचे लोक फार विचित्र आहेत. हे लोक वेगवेगळ्या रंगांच्या अंडरविअर परिधान करुन नव्या वर्षाचं स्वागत करतात. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी येथील लोक अंडरविअर परिधान करतात, त्यांना प्रेम करणारा जोडीदार मिळेल आणि पिवळ्या रंगांची अंडरविअर परिधान केली तर लगेच चांगली नोकरी मिळेल. (Image Credit : www.tripsavvy.co)

चिली - नव्या वर्षाची सुरुवात करायला अनेकजण मंदिर, चर्च आणि गुरुद्वारामध्ये जात असतील. पण स्मशानभूमीत कुणी जात नसेल. पण चिलीचे लोक असंच करतात. चिलीच्या तालकामधील लोक नव्या वर्षाची सुरुवात स्मशानभूमीत जाऊन करतात. ३१ डिसेंबरच्या रात्री लोक त्यांच्या नातेवाईकांच्या समाधीजवळ जातात आणि रात्रभर तिथेच थांबतात. असे केल्याने मृत लोकांच्या आत्म्यास शांती मिळेल अशी भावना आहे. (Image Credit : proad)