देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 04:03 PM2018-05-25T16:03:26+5:302018-05-25T16:04:12+5:30

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अॅंटीलिया' या आलिशान घराची नेहमीच चर्चा होत असते. 200 कोटी डॉलर म्हणजेच 12912 कोटी रुपयाचं आहे.

या घराचे बाहेरचे फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण आज आम्ही तुम्हाला या घराच्या आतील नजारा कसा आहे हे दाखवणार आहोत.

या इमारतीच्या वरच्या मजल्यावर 3 हेलिपॅड आहेत. हे आलिशान आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असं घर बांधण्यासाठी अंबानी यांना 11 हजार कोटी रुपये खर्च आला होतो.

मुंबईतील या आलिशान घराला 27 मजले असून 400,000 इतका या घराचा परिसर आहे.

2010 मध्ये बांधून तयार झालेल्या या भव्यदिव्य घराची देखरेख करण्यासाठी 600 कामगार आहेत.

या घराच्या खाली सुरुवातीचे सहा फ्लोर केवळ पार्किंगसाठी आहेत. या पार्किगमध्ये एकत्र 168 कार पार्क केल्या जाऊ शकतात. पार्किंगच्या वरच्या फ्लोरमध्ये 50 सीट असलेलं थिएटर आहे आणि त्यावर एक आऊटडोर गार्डन आहे.

या घरातून एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी 9 लिफ्ट्स आहेत. या घरात एक मंदिर आणि एक स्पा सुद्धा आहे.

या घरातून एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी 9 लिफ्ट्स आहेत. या घरात एक मंदिर आणि एक स्पा सुद्धा आहे.

तसेच या घरात योगा स्टुडिओ, एक आइस्क्रीम रुम आणि तीन पेक्षा जास्त स्वीमिंग पूल आहेत.

हे घर सजवण्यासाठी देशविदेशातून महगड्या वस्तू आणल्या आहेत.

या इमारतीवरुन अख्खी मुंबई बघता यावी यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या डिझाईनवरुन या घरातील इंटेरिअर कसं असेल याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.

या घरात तीन पेक्षा जास्त स्वीमिंग पूल आहेत.