किटकॅटचा 'असा' वापर तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 04:11 PM2018-07-05T16:11:02+5:302018-07-05T16:16:04+5:30

प्रपोज करण्यासाठी कोणी काही शक्कल लढवेल सांगता येत नाही. अमेरिकेतील एका तरुणानं चक्क किटकॅटच्या मदतीनं त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केलं.

इवान विल्ट नावाच्या तरुणानं हॅले बर्ड नावाच्या त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी किटकॅटचा वापर केला.

इवाननं एका गुडघ्यावर बसून हॅलेला अगदी फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. त्यावेळी त्याच्या हातात किटकॅट होतं आणि त्यामध्ये त्यानं एक अंगठी ठेवली होती.

इवान असं काही करेल याची हॅलेला जराही कल्पना नव्हती.

हॅलेनं इवानला लगेच होकार दिला. सध्या या दोघांचे फोटो ट्विटरवर चर्चेत आहेत.