फक्त मनोरंजन नाही, कार्टून कॅरेक्टर्स तुमच्या मुलांना शिकवतात बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:01 PM2018-12-18T15:01:14+5:302018-12-18T15:04:42+5:30

छोटा भीम- लहान मुलांमध्ये छोटा भीम अतिशय लोकप्रिय आहे. मनानं अतिशय दयाळू असलेला भीम कायम लोकांना मदत करतो. कायम आत्मविश्वास बाळगावा आणि गरजवंतांना मदत करावी, अशी शिकवण छोटा भीम देतो.

डेक्सटर्स लॅबोरेटरी- डेक्सटर्स छोटा आईन्स्टाईनदेखील म्हटलं जातं. मनातील जिज्ञासा कायम ठेवा, अशी शिकवण डेक्सटर्स देतो. तुमच्या मनात कायम प्रश्न निर्माण व्हायला हवेत आणि त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न तुम्ही करायला हवेत, अशी शिकवण डेक्सटर्स त्याच्या कृतीतून देतो.

पॉवर पफ गर्ल्स- पॉवर पफ गर्ल्समधून लहान मुलांना सांघिक वृत्तीचं महत्त्व समजतं. याशिवाय स्त्री पुरुष समानतेचाही धडा मिळतो.

टॉम एँड जेरी- टॉम एँड जेरी स्क्रीनवर कायम भांडत असतात. मात्र तरीही शेवटी त्यांची मैत्री कायम राहते. कितीही भांडणं झाली तरी मैत्री टिकवायची, असा बोध यातून मुलांना घेता येईल.

विन्नी द पूह- यातून मुलांना सकारात्मकता शिकता येईल. कोणालाही चुकीचं समजू नये. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायला हवं, अशी शिकवण यातून मिळते.