'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:19 PM2018-12-13T16:19:30+5:302018-12-13T16:29:02+5:30

जगातील वेगवेगळ्या देशांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. पण ही इच्छा सर्वांचीच पूर्ण होते असं नाहीये. आम्हीही तुम्हाला या ठिकाणांवर तर घेऊन जाऊ शकत नाही. मात्र या ठिकाणांवर तुम्ही जाण्याआधी या ठिकाणी असलेल्या विचित्र नियम आणि कायद्यांबाबत सांगू शकतो. जेणेकरुन तुम्ही पुढे जाऊन कधी या देशांच्या दौऱ्यावर गेलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

१) बौद्ध भिक्खू परवानगीशिवाय रुप बदलू शकत नाहीत - २००७ मध्ये मंजूर झालेल्या State Religious Affairs Order No.4 कायद्यानुसार तिबेटमध्ये बौद्ध भिक्खू हे चीन सरकारची परवानगी घेतल्याशिवाय आपलं रुप बदलू शकत नाहीत.

२) शाळेत Ketchup नेण्यावर बंदी - फ्रान्स सरकारने २०११ मध्ये केलेल्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांचं आरोग्य ठेवण्यासाठी शाळेत Ketchup, Mayo आणि Vinaigrette चा वापर करण्यावर बंदी आहे.

३) आइसलॅंडमध्ये Strip Clubs वर बंदी - २०१० मध्ये असलेल्या Strip Clubs वर बंदी घालण्यात आली होती. यासोबतच अशी बंदी घालणारा हा पहिला देश बनला.

४) बेबी वॉकरचा वापर बंद - भारतात आता जवळपास सगळीच लहान मुलं बेबी वॉकरच्या मदतीने चालताना दिसतात. पण कॅनडामध्ये तसं नाहीये. कॅनडातील सरकारने बेबी वॉकर लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं मानत, यावर बंदी घातली आहे. जर असं कुणी केलं तर त्याना दंड द्यावा लागतो.

५) या हेअरस्टाइलवर बंदी - इराणमध्ये जाणार असाल तर हे आधीच ध्यानात घ्या. कारण इथे २०१० पासून Ponytails, Mullets, Gelled आणि पुरुषांना लांब केस ठेवण्यावर बंदी घातली गेली आहे.

७) इथे व्हॅलेंटाइन डेवर बंदी - २००८ पासून सौदी अरबमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यावर बंदी आहे. तर पाकिस्तानमध्ये २०१७ पासून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यावर बंदी लावण्यात आली आहे.

८) काचेच्या भांड्यात गोल्ड फिश - २००५ पासून रोममध्ये काचेच्या भांड्यात गोल्ड फिश ठेवण्याची परवानगी नाहीये. कारण फिश या भांड्यात योग्यप्रकारे ऑक्सिजन घेऊ शकत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

९) कुत्र्याला फिरायला घेऊन जाणे - रोममध्ये जितकी काळजी माशांची घेतली जाते, तितकीच कुत्र्यांचीही घेतली जाते. इटली जगातला असा दुसरा देश आहे, जिथे २००५ पासून कुत्र्यांना फिरायला घेऊन जाणे बंधनकारक आहे. जर या नियमाचं पालन केलं गेलं नाही तर ७०० डॉलरचा दंड भरावा लागतो.

१०) मुलांची नावं सरकार ठेवणार - आपल्या मुलाचं किंवा मुलीचं मनाप्रमाणे नाव ठेवण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण डेनमार्क, आइसलॅंड आणि पोर्तुगालमध्ये यावर बंदी आहे. या देशात आपल्या मुलांची नावं ठेवण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागते.