'या' अजब नोकऱ्या पाहाल; तर चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:11 PM2018-11-22T21:11:30+5:302018-11-22T21:15:14+5:30

हॅजमट ड्रायव्हर- हे काम अतिशय जोखीमपूर्ण असतं. त्यांना अतिशय अवघड परिस्थितीत लोकांपर्यंत औषधं पोहोचण्याची कामगिरी पार पाडावी लागते. हॅजमट ड्रायव्हर सेप्टिक टँकमध्ये उतरुन मृतदेहदेखील बाहेर काढतात.

लिफ्ट पंप रिमूव्हर- टॉयलेट फ्लश केल्यानंतर संपूर्ण घाण एका पाईपमधून प्रक्रिया करणाऱ्या टाकीपर्यंत पोहोचते. अनेकदा या टाक्या अतिशय मोठ्या असतात. त्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास, ते स्वच्छ करण्यासाठी लिफ्ट पंप रिमूव्हरला टाकीत उतरावं लागतं.

इम्बाल्मर- यांचं काम अतिशय कठीण असतं. अंतिमसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह साफ करण्याचं काम इम्बाल्मर यांचं असतं. त्या व्यक्तीचे श्वास खरंच थांबले आहेत की नाही, हेदेखील त्यांना पाहावं लागतं.

आर्मपिट स्निफर- डियोड्रंट कंपन्यांमध्ये अशा प्रकारचं पद असतं. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचं काम अजब असतं. डियो काखेत स्प्रे केल्यावर त्या काखेचा वास घेण्याचं, त्याचा प्रभाव किती काळ टिकतो, हे पाहण्याचं काम आर्मपिट स्निफरला करावं लागतं.

व्हेल स्नॉट कलेक्टर- पूर्वी हे काम अतिशय कठीण असायचं. मात्र आता हेलिकॉप्टरच्या मदतीनं रिमोट कंट्रोलनं हे काम तुलनेनं सोपं झालं आहे. व्हेल माशाच्या नाकातून निघालेला दुर्गंध व्हेल स्नॉट कलेक्टरला करावा लागतो. यानंतरचं काम डॉक्टर करतात. व्हेलशी संबंधित रोगांवर संशोधन करण्यासाठी या दुर्गंधाचा वापर होतो.

फार्ट स्टॅटिस्टिशियन- सामान्यत: माणूस दिवसातून १३.६ वेळा पादतो. आता ही आकडेवारी कुठून मिळाली, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर हेदेखील एक काम असतं. त्यांना फार्ट स्टॅटिस्टिशियन म्हणतात.

चिकन सेक्सर- कुक्कुटपालन उद्योगात चिकन सेक्सर पदावरील व्यक्ती खूप महत्त्वाचं काम करतं. कोंबडीचं पिल्लू अंड्यातून बाहेर येताच त्याचं लिंग नेमकं कोणतं, हे सांगण्याचं काम चिकन सेक्सरचं असतं.

गटार, नाला स्वच्छता कर्मचारी- अनेक देशांमध्ये यासाठी मशीन असतात. मात्र अनेक देशांमध्ये आजही हे काम माणसं करतात. हे काम अतिशय अवघड असतं. अनेकदा हे काम करताना कर्मचाऱ्यांना जीवाला मुकावंदेखील लागतं.

इस्थेटिशियन- या मंडळींना दुसऱ्यांची नखं कापावी लागतात.