चार वर्षांचा पेंटिंग मास्टर; पुण्यातल्या अद्वैतनं काढलेल्या चित्राची किंमत 2 हजार डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 03:56 PM2018-05-09T15:56:23+5:302018-05-09T16:05:07+5:30

पुण्याच्या अवघ्या चार वर्षांच्या अद्वैत कोलारकरच्या चित्रांची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेंट जॉन आर्ट सेंटरमध्ये अद्वैतनं काढलेलं एक चित्र 2 हजार डॉलर्सना (1.3 लाख रुपये) विकलं गेलं.

सध्या अद्वैत कोलारकरनं रेखाटलेल्या चित्रांची संपूर्ण जगात चर्चा आहे. त्यानं काढलेली चित्र हजारो डॉलर्सला विकली जात आहेत.

पुण्यात जन्मलेला अद्वैतचं कुटुंब सध्या कॅनडामध्ये असतं. 2016 मध्ये अद्वैत आणि त्याचं कुटुंब कॅनडामध्ये स्थलांतरित झालं.

सेंट जॉन आर्ट सेंटरमधील चित्र प्रदर्शनात सहभागी होणारा अद्वैत हा सर्वात कमी वयाचा चित्रकार होता.

अद्वैतच्या चित्रांमध्ये गॅलेक्सी, डायनासोर, ड्रॅगनचा प्रभाव जास्त जाणवतो. याच विषयांना घेऊन तो अतिशय मनमोहन चित्र काढतो.