पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:52 PM2018-06-01T18:52:36+5:302018-06-01T18:52:36+5:30

एखाद्याच्या अंगात कला असली तर मग त्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी कोणतेही माध्यम पुरेसे असते. शिल्पकार जेसेन्को दोरदेविक यांच्या काही कलाकृती पाहून तुम्हाला नक्कीच याचा प्रत्यय येईल.

जेसेन्को यांनी पेन्सिलच्या टोकावर भन्नाट अशी शिल्पं साकारली आहेत.

प्रसिद्ध शिल्पकार डाल्टन घेत्ती यांच्या पेन्सिल शिल्पांपासून प्रेरणी घेऊन जेसेन्को याने पेन्सिलच्या टोकावर कलाकारी करायला सुरुवात केली.

जेसेन्को याने थोड्याच काळात पेन्सिलच्या टोकावर एकापेक्षा एक सरस शिल्पं साकारायला सुरुवात केली.

जेसन्कोने आपल्या शिल्पात मोठ्या वास्तू किंवा गोष्टींना लीलया पेन्सिलच्या टोकावर साकारले आहे