फॅशन वर्ल्डमध्ये विचित्र ट्रेन्ड; हॉलिवूड अभिनेत्रीही झाल्या क्रेझी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 05:03 PM2018-09-07T17:03:00+5:302018-09-07T17:08:09+5:30

दररोज नवनव्या फॅशन ट्रेन्ड होत असतात. यामध्ये प्रामुख्याने कपड्यांच्या फॅशन्स किंवा दागिन्यांच्या फॅशन्सचा समावेश असतो. परंतु सध्या फॅशन्सच्या व्याख्या बदललेल्या दिसतात.

फॅशनच्या नावावर सध्या अनोखे आणि चित्र-विचित्र ट्रेन्ड व्हायरल होताना दिसतात. परंतु, सध्या व्हायरल होत असलेला ट्रेन्ड आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या ट्रेन्डपैकी एक आहे. हा फॅशन ट्रेन्ड फेक स्किन इम्प्लांटचा आहे.

हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल किम कार्दिश आणि क्रिस टेगेनने इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉडी मॉडिफिकेशन आणि एक्सेसरिज प्लान्ट करताना दिसून आल्या आहेत. हे कृत्रिम स्कीन ट्रान्सप्लान्ट असलं तरीही शरीराचा हिस्सा असल्याचं दिसून येतं. कोणी आपल्या खाद्यांवर शिंग लावून घेतली आहेत तर कोणी गळ्याला नेकलेस तयार केला आहे.