...अन् कुत्र्यामुळे तिला सापडला स्वत:मध्ये दडलेला फोटोग्राफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 03:10 PM2019-04-11T15:10:15+5:302019-04-11T15:16:50+5:30

21 वर्षांची क्रिस्टिना क्वपिलोवा कुत्र्यांची फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे. तिनं काढलेले फोटो सुंदर फोटो इंटरनेटवर दाद मिळवतात. झेक प्रजासत्ताकमध्ये राहणाऱ्या क्रिस्टिनानं फोटोग्राफी करण्यासाठी चांगली नोकरी सोडली.

क्रिस्टिनानं तिच्या पाळीव कुत्र्यामुळे पूर्णवळ फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीतल्या तोचतोचपणाला कंटाळलेली क्रिस्टिना तिच्या 7 वर्षांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला जायची. तेव्हाच तिला फोटोग्राफीचं वेड लागलं.

ऑफिसमधले ठरलेले तास, प्रवासाचा ताण यापेक्षा निसर्गाच्या जवळ जाऊन फोटोग्राफी करणं क्रिस्टिनाला आवडू लागलं. त्यानंतर तिनं नोकरीचा राजीनामा देऊन फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला.

क्रिस्टिना जिथं जिथं जाते, तिथं तिचा 7 वर्षांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड कुत्रा सोबत आहे. क्रिस्टिनानं त्याचं नाव चार्ली ठेवलंय.

चार्ली विविध प्रकारच्या ट्रिक्स करण्यात वाकबगार आहे. त्यामुळेच क्रिस्टिनाला त्याचे एकापेक्षा एक सुंदर फोटो काढता येतात.

एकदा चार्लीसोबत बाहेर फिरायला गेले असताना त्याचे काही फोटो काढले. त्यात मला आनंद मिळाला. चार्लीमुळेच मला माझ्यातला फोटोग्राफर सापडला, असं क्रिस्टिना सांगते.

आता जगभरात भटकायचं आणि फोटोग्राफी करायची, असं स्वप्न क्रिस्टिनानं उराशी बाळगलंय.