टाकाऊतून टिकाऊ! असा करा पिझ्झा बॉक्सचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 06:25 PM2019-01-13T18:25:41+5:302019-01-13T18:34:30+5:30

पिझ्झा बॉक्स टाकून न देता तुमच्या विविध वस्तू ठेवण्यासाठी असे ड्रॉवर तयार करता येऊ शकतात.

पिझ्झा बॉक्सपासून अशी सुंदर खुर्ची तयार करता येऊ शकते. यावर बसता येणं शक्य नाही. मात्र ही खुर्ची नक्कीच तुमच्या घराच्या सौंदर्यात भर घालेल.

जर तुम्हाला, तुमच्या मुलांना फुटबॉल आवडत असेल, तर पिझ्झा बॉक्सचा वापर फुटबॉलचं मैदान तयार करून खेळाचा आनंद घेता येईल.

पिझ्झा बॉक्सचा वापर लहानग्यांच्या गाड्यांचं गॅरेज तयार करण्यासाठी करता येऊ शकतो.

पिझ्झाचे 5-6 रिकामी बॉक्स तुमच्याकडे असतील, तर त्यापासून डेस्क ऑर्गेनायजर तयार करता येऊ शकतं. यामध्ये तुम्हाला अनेक वस्तू ठेवता येतील.

जर तुमच्या मुलांना चित्रकलेची आवड असेल, तर पिझ्झा बॉक्सचा वापर कॅनव्हास म्हणून करता येईल.

जर तुमच्या मांजर असेल, तर तिच्यासाठी बिछाना म्हणून पिझ्झा बॉक्सचा वापर करता येऊ शकेल.

पिझ्झा बॉक्सचा वापर फुली गोळा खेळण्यासाठी होऊ शकतो.