रस्त्यावर धावणारी 'ही' अनोखी ट्रेन पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 02:43 PM2018-11-20T14:43:53+5:302018-11-20T15:04:50+5:30

ट्रेन रुळावर धावते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र चीनमध्ये आता रुळावर नव्हे तर रस्त्यावर धावणारी अनोखी ट्रेन आली आहे. चीनमधील ही ट्रेन रस्त्यावर म्हणजेच व्हर्चुअल ट्रॅकवर धावते.

चीनच्या हुनान प्रांतातील झुझाऊ शहरात या ट्रेनची ट्रायल घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. चीनमधील ही ट्रेन प्रदूषण रहीत आहे.

चीन रेल कॉर्पोरेशनने 2013 मध्ये या प्रकारच्या ट्रेनचे डिझाईन तयार करण्यास सुरुवात केली होती. पुढच्या वर्षीपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

दहा मिनिटाच्या चार्जिंगमध्ये ही ट्रेन जवळपास 25 किलोमीटर धावणार आहे. तसेच चीनमधील या ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चीनमधील या ट्रेनसाठी रस्त्याच्या आतमध्ये काही ठिकाणी सेन्सर लावण्यात आले आहेत. या सेन्सरच्या मदतीने ही ट्रेन रस्त्यावर धावणार आहे.

बस किंवा ट्रामप्रमाणे ही ट्रेन तयार करण्यात आली असून या अनोख्या ट्रेनमध्ये एकाच वेळी 300 जण प्रवास करु शकतात.

चीनमधील या ट्रेनमध्ये बस आणि ट्रेनप्रमाणेच स्टेअरिंग लावण्यात आले आहे. यामुळेच ड्रायव्हरला ती ट्रेन हवी तशी वळवता येणे सोपे होणार आहे.

चीनमधील या ट्रेनसाठी जवळपास 76 कोटींचा खर्च येतो. तसेच आधीच्या ट्रेनच्या तुलनेत आताच्या ट्रेनसाठी येणारा खर्च हा यापेक्षा अधिक असतो. ही नवीन ट्रेन 25 वर्ष सेवा देऊ शकते.