प्रत्येक ऑफिसमध्ये असतात 'असे' बॉलीवूड कॅरेक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 03:57 PM2018-07-06T15:57:55+5:302018-07-06T16:37:12+5:30

चित्रपट समाजाचा आरसा असतो, असं म्हणतात. त्यामुळेच चित्रपटात दिसणाऱ्या अनेक व्यक्तीरेखा आपल्याला जवळच्या वाटतात. मग अशा व्यक्तीरेखांना आपण आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक ऑफिसमध्ये खूप गॉसिप करणारं जब वी मेटमधील गीतसारखं एखादं कॅरेक्टर असतं.

प्रत्येक ऑफिसमध्ये एक आएशा असते, जी फॅशन आणि स्टाईलबद्दल खूपच सजग असते.

महिन्याचं टार्गेट कसंही करुन पूर्ण करणारा एखादा रॉकेट सिंग प्रत्येक ऑफिसमध्ये असतो.

तमाशामधील वेदसारखं एखादं कॅरेक्टर तुमच्या ऑफिसमध्ये नक्कीच असेल. बाहेरुन वेगळा दिसणारा, मात्र अगदी वेगळाच भासणारा असा कोणी तुमच्या ऑफिसमध्ये आहे का?

ये जवानी है दिवानीमधल्या नैनासारखी एखादी मुलगी तुमच्या ऑफिसमध्ये असू शकते. आपलं काम अगदी व्यवस्थित करणारी आणि कधीही कोणत्याही वादात न सापडणारी नैना..

असा एखादा अली प्रत्येक ऑफिसमध्ये असतो. नवीन मुलगी दिसली की अली साहेब हजर.. तुमच्या ऑफिसमध्ये असा कोणी अली आहे का?

बनी हे कॅरेक्टरदेखील तसं सगळीकडेच आढळतं. सर्वांना कायमच या बनीचा हेवा वाटतो.

असे हॅरी आणि सेजल तुमच्या ऑफिसमध्ये नक्कीच असतील. संपूर्ण ऑफिसला माहित असतं की यांचं काहीतरी सुरू आहे म्हणून... पण हे कायमच ती गोष्टी लपवतात.

प्रत्येक ऑफिसमध्ये एखादा सर्किट असतो. कोणत्याही गोष्टीसाठी जुगाड करण्यात ही व्यक्ती अगदी एक्स्पर्ट असते.