डोळ्यांचं पारणं फेडणारी कारंजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:54 PM2018-10-11T21:54:18+5:302018-10-11T21:57:26+5:30

मेटलमोर्फोसिस (अमेरिका)- स्टेनलेस स्टिलपासून तयार करण्यात आलेलं हे कारंजं 360 अंशांमध्ये फिरतं.

जुली पेनरोस फाऊंटन (अमेरिका)- स्टिलपासून तयार करण्यात आलेलं हे कारंजं जगातील सुंदर कारंजांपैकी एक आहे.

वॉटर बोट फाऊंटन (स्पेन)- कारंजाच्या पाण्यातून या ठिकाणी सुंदर नाव तयार होते. विशेष म्हणजे ही नाव शिडाची आहे.

डायवर्स फाऊंटन (यूएई)- हे कारंजं तब्बल 24 मीटर उंच आहे. दुबईच्या एका मॉलमध्ये हे डोळ्यांचं पारणं फेडणारं कारंजं आहे.

बन्पो ब्रिज रेनबो फाऊंटन (दक्षिण कोरिया)- पुलातून निघणाऱ्या या कारंजामुळे पुलाला अप्रतिम सौंदर्य प्राप्त झालं आहे. या कारंज्यातून एका सेकंदाला 190 टन पाणी बाहेर पडतं. लेझर लाईट्समुळे या ठिकाणी पाणी इंद्रधनुष्याच्या रंगाचं दिसतं.

द फाऊंटन्स ऑफ बेलाजिओ- अमेरिका- या कारंजातून पाणी तब्बल 4 हजार 600 फूट उंच उडतं.