भीमा-कोरेगाव हिंसाचार : महाराष्ट्र बंद मुळे जळगाव जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:55 PM2018-01-03T15:55:45+5:302018-01-03T16:24:48+5:30

महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी दिवसभर कजगाव येथे व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली.

जळगाव शहरातील प्रमुख मार्केट बंद होते. तोडफोड होऊ नये म्हणून जळगाव शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

महाराष्ट्र बंद दरम्यान सर्वाधिक फटका हा एस.टी.महामंडळाला बसला. जळगाव बसस्थानकात अनेक फेºया रद्द करण्यात आल्या. बस स्थानकावर प्रवाशांअभावी शुकशुकाट होता.

महाराष्ट्र बंदमुळे अनेक प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे जळगाव रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता.

जळगावातील सर्वाधिक वर्दळीचे महात्मा फुले मार्केट बुधवारी बंद होते.

अमळनेर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी खाली पाडून नुकसान करण्यात आले.

अमळनेर शहरातील एका औषधीच्या दुकानावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले.

भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध म्हणून अमळनेर येथे प्रातांधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध म्हणून अमळनेर येथे मोर्चा काढण्यात आला.

भुसावळ येथे हल्लेखोरांनी फैजपूर बसवर दगडफेक करीत नुकसान केले.