शिवजयंतीनिमित्त जळगावात भगवे वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:25 PM2018-02-19T14:25:23+5:302018-02-19T15:05:05+5:30

जळगाव शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत खासदार ए.टी.पाटील व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सहभाग घेतला.

मिरवणुकीत चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या. माजी महापौर किशोर पाटील यांनी लाठी फिरविली.

काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आरास सादर केली.

शिवजयंती मिरवणुकीत बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा सादर केला.

शिवजयंती मिरवणुकीत विद्यार्थीनींनी शिस्तबद्ध लेझीम नृत्य सादर केले

शिवजयंती मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले.

शिवजयंती मिरवणुकीत तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत मिरवणुकीची सांगता झाली.

शिवजयंतीनिमित्त तरुणांनी नृत्य सादर केले.

शिवजयंतीनिमित्त सकाळी प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.