जगभरातील चर्चेतलं टायगर टेम्पल, इथे एकत्र राहत होते भिक्षुक व वाघ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 12:10 AM2017-10-18T00:10:04+5:302017-10-18T00:13:11+5:30

थायलंडच्या कंचनबुरी प्रांतात एक असं मंदिर आहे जिथे भिक्षुक व वाघ एकत्र राहत होते.

काही काळानं या वाघांची तस्करी होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ते बंद करण्यात आलं.

कंचनबुरी प्रांतातल्या या मंदिराला टायगर टेम्पल नावानंही ओळखलं जातं. थायलंडमधील कंचनबुरी प्रांतातील हे टायगर टेम्पल एके काळी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.

40 वाघांच्या बछड्यांचे मृतदेह आढळल्यानंतर हे टेम्पल बंद करण्यात आलं.

तसेच कंचनबुरी प्रांतातल्या टायगर टेम्पलमध्ये वाघांच्या तस्करीचे प्रकार समोर आल्यानंतर ते सील केलं.