हे आहे जगातलं सर्वात मोठं विमान, फुटबॉल मैदानापेक्षाही लांब विमानाचे पंख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 02:58 PM2019-04-14T14:58:12+5:302019-04-14T15:00:57+5:30

जगातलं सर्वात मोठं विमानाची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दोन टोक असलेल्या बोईंग 747 विमानाला सहा इंजिन लावण्यात आले आहेत. या विमानाच्या पंखांची लांबी 385 फूट इतकी आहे. अमेरिकेतील फुटबॉल मैदानापेक्षाही जास्त या विमानाच्या पंखांची लांबी आहे.

या विमानाने शनिवारी मोयावे रेगिस्तान याठिकाणी आपलं पहिलं उडाण घेतलं. हे विमान अंतराळात रॉकेट लॉन्च करण्यासाठी खासकरुन बनवून घेतलं आहे. या विमानाच्या साहय्याने थेट अंतराळात रॉकेट लॉन्च केलं जाऊ शकते.

स्ट्रेटोलॉन्च नावाच्या कंपनीने हे विमान बनवलं आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर उत्पादन कंपनीमधील एक माइक्रोसॉफ्टचे सह संस्थापक पॉल एलन यांनी 2011 मध्ये बनवली आहे. आज स्ट्रेटोलॉन्चने अडीच तास हवेत भरारी घेतली.

सकाळी 6.58 मिनिटांनी या विमानाने आकाशात भरारी घेतली. जवळपास 302 किमी प्रतितास वेगाने मोयावे रेगिस्तान इथं 17 हजार फूट उंचीवर या विमानाने उडाण घेतली.

स्ट्रेटोलॉन्चचे सीईओ जीन फ्लॉयड यांनी सांगितले की, आमचं पहिल उडाण खूप शानदार झालं. मी स्ट्रेटोलॉन्च टीमचं सगळ्यांचे आभार मानतो, माझ्या सहकाऱ्यांवर मला गर्व आहे. जगामध्ये सर्वात मोठं विमान म्हणून स्ट्रेटोलॉन्चने ओळख निर्माण केली आहे. याचं वजन 5 लाख पाउंड आहे.

टॅग्स :विमानairplane