नाश्त्यात काय खातात हे जगातील अब्जाधीश, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:48 PM2018-09-29T15:48:14+5:302018-09-29T15:53:48+5:30

जगभरातले अब्जाधीश व्यक्ती नाश्तामध्ये काय खातात, याची अनेकांना उत्कंठा असते. मुकेश अंबानी हे पहाटे पाच वाजता उठून हेल्दी फूड खातात.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे नाश्त्यामध्ये पॅन केक, अंडी खाण्याला प्राधान्य देतात.

फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांचा नाश्ता ठरलेला नसतो. ते नाश्त्यात काहीही खाणं पसंत करतात.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे नाश्त्यात शाकाहाराला महत्त्वाचं स्थान देतात.

बर्कशायर हॅथवेचे 86 वर्षीय वॉरेन बफेट हे नाश्त्यामध्ये चॉकलेट आणि आइस्क्रीम खातात, तसेच कोका कोलाही पितात.

व्हर्जिन ग्रुपचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रान्सन हे नाश्त्यामध्ये जास्त फायबरयुक्त पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. ते नाश्त्यात फ्रूट सलाड आणि मुइस्ली खातात.