फ्रान्समध्ये सरकारविरोधात कामगारांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 06:06 PM2017-09-19T18:06:30+5:302017-09-19T18:12:40+5:30

फ्रान्समध्ये कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. त्याविरोधात येथील नॅन्टेसमध्ये अनेक संघटनांनी आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

तसेच, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रोन यांच्या सरकारविरोधात हे पहिलेच आंदोलन आहे.

सरकारच्या या निर्णयाविरोधात रेल्वे कर्मचारी, डावे पक्ष आणि अनेक कामगार संघटना उतरल्याने अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले.

याचबरोबर, या आंदोलनामुळे फ्रान्समध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या कंपन्यांना गरजेनुसार कामगारांना काढून टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे.