लॉस एंजल्समध्ये वेगाने पसरतोय वणवा

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 3:58pm

अमेरिकेच्या पश्चिमेस असणाऱ्या लॉस एंजल्सच्या उत्तरेस लागलेला वणवा वेगाने पसरत चालला आहे. सॅंटा अॅना या वेगवान वाऱ्यांमुळे ही आगही ताशी पन्नास मीटर वेगाने पुढे सरकत आहे.
या आगीमुळे 2 लाख 45 हजार एकर इतक्या क्षेत्रावरचे जंगल नष्ट झाले असून 8900 कुटुंबांना आपली घरे मोकळी करुन बाहेर पडावे लागले आहे.
लॉस एंजल्सच्या वायव्येस असणाऱ्या व्हेंचुरा या डोंगराळ प्रदेशात आणि व्हेंचुरा कंट्री येथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.बेल एअरमध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लॉस एंजल्स पोलिसांनी ब्रेन्टवूड येथील पोलिसांना आपली घरे मोकळी करण्याचे आदेश दिले असून अनेक गावांमधील नागरिकांनी कालपासून घरे मोकळी करण्यास सुरुवात केली आहे.
या वणव्याला नैसर्गिक संकट म्हणून घोषित करण्यात आले आहे.

संबंधित

स्ट्रॉबेरीचे हे ५ गुण मानवी आरोग्यासाठी असतात फार उपयोगी
#HappyNewYearWishes : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे 'मेसेज'
#BestOf2017: महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी
या ५ गोष्टी पार्टनरसाठी कधीच करू नका
अमेरिकेत हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

थंडीमुळे तलावातील पाण्यासोबत मगरीही गोठल्या
अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने
जपानमध्ये डोळे दिपविणारा लाइट फेस्टिव्हल!
या देशात तारुण्यही साजरं करतात जल्लोषात
उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा गोठला बर्फाने, पर्यटकांची वाढली गर्दी

आणखी वाचा