जगातल्या या 6 अद्भुत हॉटेलला नक्कीच भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:50 PM2018-04-06T20:50:05+5:302018-04-06T20:50:05+5:30

बालीचं उंबांग हाऊस हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. या हॉटेलमध्ये समुद्रातल्या जलचर प्राण्यांबरोबर राहिल्याचा आभास होतो.

फ्रान्समधलं रिव्स हॉटेलही फुग्यासारखं आहे. तुम्ही या हॉटेलमध्ये एक रात्र घालवल्यावर तुम्हालाही फुग्यात असल्याचा अनुभव येईल.

फिनलँडमधलं गोल्डन क्राऊन लेविन इग्लाट हे हॉटेल शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इग्लूच्या आकाराच्या या हॉटेलमध्ये पहुडल्यास आकाशातल्या ता-यांची गुजगप्पा मारत असल्याचा भास होतो.

सेंट लुसियामधलं जेड माऊंटन हे हॉटेलही एका उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना आहे. या हॉटेलमधले कमरे मोठे असून, तुम्हाला इथं राहिल्यास कॅरिबियन जंगलात राहिल्यासारखं वाटतं.

दक्षिण आफ्रिकेतल्या सेंचुरी मकान्यालय लक्झरी सफारी लॉज हे मेरिको नदीवर स्थित आहे. या लॉजमधून तुम्हाला निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहण्याचा योग येईल.

टांझानियातल्या मोंटा रिझॉर्टही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. तीन मजल्यांच्या हॉटेलचा खालचा मजला हा पाण्यात बुडलेला आहे.

टॅग्स :हॉटेलhotel