चीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 08:31 PM2018-12-28T20:31:38+5:302018-12-28T20:36:07+5:30

चीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे. तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधील जिनानमध्ये बांधण्यात आला आहे.

चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.

हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते.

एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.

दरम्यान, सोलर हायवे प्रकल्पावर फ्रान्स, हॉलंड सारखे देशही काम करत आहेत.