थायलंडच्या नागरिकांनी लोकप्रिय राजाला दिला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 01:02 PM2017-10-26T13:02:02+5:302017-10-26T13:26:07+5:30

थायलंडचे राजे भूमिबोल अदुल्यादेज यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांना थायलंडचे राष्ट्रपिता म्हटले जाते.

88 व्या वर्षी निधन झालेल्या भूमिबोल यांनी अनेक वर्षे थायलंडची राजगादी सांभाळली होती.

एक वर्षाच्या दुखवट्यानंतर त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत सामिल होण्यासाठी थायी लोकांनी आदल्या दिवसापासूनच रस्त्यांवर गर्दी केली होती.

भूमिबोल यांच्या अंत्यसंस्कारासाठी 40 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले असून या अंत्यसंस्कारासाठी 9 कोटी डाॅलर्स खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :मृत्यूDeath