न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरात दहशतवादी हल्ला, आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:16 AM2017-11-01T10:16:27+5:302017-11-01T10:20:24+5:30

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले.

मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किनाऱ्यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचाऱ्यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडलं.

माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्याकडील असलेला शस्त्रसाठा जप्त केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. न्यूयॉर्कमधील हल्ला हा आजारी आणि माथेफिरू व्यक्तीकडून करण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.