काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला ! 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 02:40 PM2018-01-05T14:40:53+5:302018-01-05T14:43:03+5:30

काबुलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी (4 जानेवारी) पोलीस व आंदोलनासाठी जमलेल्या गर्दीमध्ये हल्लेखोरानं स्वतःला उडवलं.

हल्लेखोरानं सुरक्षा व्यवस्थेत तैनात केलेल्या पोलीस कर्मचा-याच्या जवळच स्वतःला उडवल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.