लाइव न्यूज़
 • 04:23 PM

  नाशिक : मांगीतुंगी क्षेत्रात सगळी मंजूर विकासकामे पूर्णत्वास येणार, विश्व शांती भवन निर्मितीचा मार्गही लवकरच मोकळा होईल - देवेंद्र फडणवीस

 • 04:21 PM

  नाशिक : निसर्गसोबत सहिष्णुता दाखविण्याची गरज आहे. भोग बाजूला ठेवून त्याग करत निसर्गाचा उपभोग घ्यावा - देवेंद्र फडणवीस

 • 04:19 PM

  नाशिक : सध्याच्या युगात जगाची जी स्थिती झाली आहे, त्यासाठी अहिंसा शिकवण तारणारी आहे - देवेंद्र फडणवीस

 • 04:19 PM

  नाशिक : भगवान ऋषभदेव करुणेचे मोठे उपासक असून त्यांनी अहिंसेचा संदेश समाजाला दिला. ऋषभदेव यांची मूर्ती फक्त सर्वात विशाल नसून विचारांना ही विशाल करणारी ठरत आहे - देवेंद्र फडणवीस

 • 03:42 PM

  नाशिक : मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून उद्धाटन; राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित.

 • 03:34 PM

  कल्याण : केडीएमसी मुख्यालयात कंत्राटी कामगारांचा गोंधळ, प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन, आयुक्तांच्या आश्वासनानंतरही अद्याप पगार नाही.

 • 03:01 PM

  साताऱ्यात दोन्ही राजे आमनेसामने; तणावाचे वातावरण, जुना मोटार स्टँड येथील देशी दारूचे दुकान बंद-चालू करण्यावरुन वाद, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.

 • 03:00 PM

  भंडारा : तुमसरमध्ये गिफ्ट सेंटरमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दुकान मालकाने केला दीड महिने अत्याचार; सुनील संपत साठवणे असे आरोपीचे नाव, तुमसर ठाण्यात गुन्हा दाखल.

 • 02:43 PM

  नाशिक : मांगीतुंगी येथील ऋषभ देवपूरम येथे जिल्हा पोलीस प्रशासनाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था; सुमारे ९०० पोलीस, कर्मचारी २०० अधिकारी असे ११०० अतिरिक्त पोलीस दल तैनात.

 • 02:42 PM

  नाशिक : मांगीतुंगी येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून भगवान ऋषभदेव पर्वताला प्रदक्षिणा.

 • 02:20 PM

  नाशिक : मांगीतुंगी येथील विश्व शांती संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्नीक ओझर विमान तळावर विशेष विमानाने आगमन; राज्यपाल सी. विद्याधर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले स्वागत.

 • 02:06 PM

  ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर, कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून अतिरिक्त एक महिन्याच्या पगार देण्यात येणार - रवी राव, म्युनिसिपल लेबरचे कार्याध्यक्ष

 • 01:49 PM

  नाशिक : ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे विश्व अहिंसा संमेलन नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर सुरू होण्याची चिन्हे

 • 01:48 PM

  नाशिक : विश्व अहिंसा संमेलन ऋषभदेवपूरम मांगीतुंगीच्या दिशेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिक ओझर विमानतळावरून उड्डाण

 • 01:16 PM

  नाशिक : ऋषभ देव पुरम मांगीतुंगी येथील विश्व अहिंसा संमेलनात भजनगायक रुपेश जैन (इंदोर) यांचे भजन सुरू

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com