एंगेजमेंटला त्यानं दिली तिला 19 कोटींची अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 03:34 PM2017-12-31T15:34:50+5:302017-12-31T15:40:51+5:30

डेल कॉम्प्युटर बनविणा-या डेल टेक्नॉलॉजीचे सीईओ माइकल डेल यांची मुलगी अलेक्सा डेल हिला तिच्या प्रियकरानं 19 कोटींची अंगठी दिली आहे.

जगातील 37 क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा चिरंजीव हॅरिसन यांच्यासोबत तिची एंगेजमेंट झाली आहे.

या दोघांच्या एंगेजमेंटची सध्या चर्चा सुरू आहे. हॅरिसनने या राजकुमारीला तब्बल 19.5 कोटी रुपयांची अंगठी दिली आहे.

यात 12 कॅरेटचा अतिशय सुंदर हिरा आहे. माइकल डेल यांची एकूण संपत्ती 1.53 लाख कोटी रुपये आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव आहे.