पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियात उडवला पतंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 08:55 PM2018-05-30T20:55:23+5:302018-05-30T20:55:23+5:30

जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौ-यावर आहेत. येथील जकार्तामधील मॉन्यूमेंट सेंटरमध्ये पतंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

रामायण आणि महाभारत या थीमवर या प्रदर्शनात पतंग तयार करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन नरेंद्र मोदी आणि जोको व्हिडोडो यांनी केले. यावेळी त्यांनी पतंग उडवला.

नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्याशी जकार्तामधील मर्डेका पॅलेसमध्ये चर्चा केली.

भारत आणि इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी दहशतवादाच्या मुद्यावर त्यांनी निशाना साधला. दोन्ही देशांत 15 करारांवर सह्या करण्यात आल्या.

त्याचबरोबर, नरेंद्र मोदींनी जकार्तामधील भारतीयांची भेट घेतली.