अंतराळात पार पडली 'पिझ्झा' पार्टी

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 3:53pm

सोशल मीडियावर अंतराळात अंतराळवीर पिझ्झा पार्टी करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसं शक्य आहे? पण अंतराळवीरांनी हे शक्य करुन दाखवलं आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या अंतराळवीरांना आईस्क्रीम आणि पिझ्झा खाण्याची फार इच्छा झाली होती. पण तिथं पिझ्झा बनवणार कसा आणि साहित्य कसं पोहोचणार हा प्रश्न होता. मात्र अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून रविवारी सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचवलं होतं.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असलेले इटलीचे अंतराळवीर पाओलो नेस्पोली यांनी सांगितल्याप्रमाणे, एका लाईव्ह कार्यक्रमात त्यांच्या वरिष्ठांच्या हातात पिझ्झा टॉपिंग्स पाठवण्यात आली. त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे व्यवस्थापक किर्क शायरमैन यांनी पिझ्झासाठी लागणारे बाकीची साहित्य दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं.
पिझ्झा बनवण्याचा व्हिडिओ नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हवेत उडणारा पिझ्झा, तो पिझ्झा व्यवस्थित होण्यासाठी अंतराळवीरांचे परिश्रम दिसतात. पिझ्झा बनवून झाल्यावर सगळ्याच अंतराळवीरांनी दणक्यात पिझ्झा पार्टी साजरी केली. बऱ्याच दिवसांनी पिझ्झावर ताव मारायला मिळाल्याने सगळेच अंतराळवीर आनंदात होते.

संबंधित

'जगाच्या सफरीवर जायचंय...तर हे आहेत सर्वात स्वस्त देश'

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

थंडीमुळे तलावातील पाण्यासोबत मगरीही गोठल्या
अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने
जपानमध्ये डोळे दिपविणारा लाइट फेस्टिव्हल!
या देशात तारुण्यही साजरं करतात जल्लोषात
उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा गोठला बर्फाने, पर्यटकांची वाढली गर्दी

आणखी वाचा