भारत आणि पाकमधील पंतप्रधानपदाच्या शपथग्रहणात वेगळेपणा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 08:15 PM2019-05-28T20:15:28+5:302019-05-28T20:19:28+5:30

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शपथविधी सोहळा भारतापेक्षा वेगळा असतो. पाकमध्ये अशी शपथ घेतली जाते की तिथल्या पंतप्रधानांना ती पुन्हा पुन्हा म्हणणं गरजेचे असते. भारत आणि पाकच्या शपथविधी सोहळ्यात अनेक फरक आहेत.

पाकमध्ये पंतप्रधान धार्मिक विश्वासाला साक्ष ठेऊन पाकिस्तानला एक मुस्लिम राष्ट्र बनविण्याचा संकल्प शपथेत घेतला जातो. तर भारतामध्ये संविधानाला साक्ष ठेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी शपथ घेण्याची प्रथा आहे.

पाकमध्ये शपथेपूर्वी इस्लामच्या प्रतीची आठवण केली जाते तर पाकचे पंतप्रधान म्हणतात की, मी ..(पूर्ण नाव) पूर्ण प्रामाणिकपणे शपथ घेतो की, मी एक मुसलमान आहे आणि सर्वशक्तिमान अल्लाहची एकता आणि एकेश्वर रुपावर विश्वास करतो.

पंतप्रधान पवित्र कुराणाला अंतिम पुस्तक आणि हजरत मोहम्मद यांना अंतिम पैंगबर मानून शपथ घेतली जाते. मी प्रलयाच्या दिवशी पवित्र कुराणातील शिकवणी लक्षात ठेऊन सुन्नतच्या सर्व बाबींचे रक्षणाची खबरदारी घेईल.

भारताच्या पंतप्रधानाला शपथ घेताना गोपनीयतेची शपथही घ्यावी लागते. भारतीय संविधानातील कायद्यांना धरून शपथ ग्रहण केली जाते. मी ...(पूर्ण नाव) ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की, घटनेद्वारे स्थापित भारतीय संविधानावर श्रध्दा आणि निष्ठा ठेवेन.

त्यापुढे शपथेमध्ये भारताची प्रभुता आणि अखंडता यांचे रक्षण करेन. मी कोणत्याही भितीशिवाय पक्षपात, कोणताही राग मनात न धरता देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण करेन, आणि संविधानानुसार त्याच्यासोबत न्याय करेन

भारतात पंतप्रधानांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. यामध्ये पंतप्रधान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देशाच्या सुरक्षेशी जोडलेल्या कोणत्याही विषयाची माहिती मी कोणत्याही व्यक्तीला देणार नाही अशी शपथ घेतो.