उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा गोठला बर्फाने, पर्यटकांची वाढली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 02:04 PM2018-01-06T14:04:15+5:302018-01-06T14:07:02+5:30

थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत जातो आहे. भारतातही तापमान चांगलंच खाली उतरलंय. पण अमेरिका आणि कॅनडामध्ये तर चक्क तापमान उणे ३० ते उणे ४० च्या घरात असल्याने तिथं सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली दिसते आहे. उत्तर अमेरिकेतला नायगरा धबधबा तर पूर्णपणे बर्फाने गोठला आहे

जगभरातील पर्यटकांसाठी नायगरा धबधबा प्रचंड प्रसिद्ध आहे. लोकांनी आता तिथे जाऊन फोटोग्राफी करायला सुरुवात केली आहे.

सध्या विविध सोशल मीडिया साईट्सवर नायगरा धबधब्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यावर पृथ्वीवर स्वर्ग तयार झाल्यासारखा भास होतो. सगळीकडे पांढरी चादर पसरल्याने त्या प्रदेशांना एक वेगळाच लुक प्राप्त झालाय.

नायगरा धबधबा आंतरारष्ट्रीय पर्यटकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यात आता सगळीकडे बर्फाच्छदित प्रदेश तयार झाल्याने इथं लोक मुद्दाम भेट द्यायला येत आहेत. खरंतर तापमान एवढं खाली उतरलंय की घराच्या बाहेर पडणंही मुश्किल बनलं आहे. सध्या इथं उणे १४ अंश सेल्सिअस तापमान आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत.

या धबधब्यातून प्रत्येक सेकंदाला ३ हजार टन पाणी खाली पडत असतं. पण हे पाणी गोठल्यामुळे सगळीकडे बर्फ पसरला आहे. नद्या,नाले सारं काही गोठलं आहे. त्यामुळे या प्रदेशाला स्वर्गाचं रुप प्राप्त झालंय.