हे आहेत जगातील सर्वात 'वजनदार' लोक, बघा मोदी कितव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 04:01 PM2018-05-09T16:01:32+5:302018-05-09T16:19:46+5:30

फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तीशाली 75 लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आहेत.

दुसऱ्या स्थानावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत.

तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. गेल्यावर्षी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

जर्मनीतील राजकीय नेत्या एंजेला मर्कल चौथ्या क्रमांकावर आहेत. 2000 पासून मर्कल जर्मनीच्या राजकारणात सक्रिय आहेत.

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.

सहाव्या स्थानावर ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस आहेत.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सातव्या स्थानावर आहेत.

साऊदी अरबचे मोहम्मद बिन सलमान आठव्या स्थानावर आहेत

जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 व्या स्थानावर आहेत.

गूगलचे सह संस्थापक लॅरी पेज दहाव्या स्थानी आहेत.