मित्राच्या लग्नात केलं असं काम, विश्व रेकॉर्डमध्ये झालं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 09:40 PM2019-05-15T21:40:38+5:302019-05-15T21:50:05+5:30

ऑटो रिक्षामध्ये बसल्या बसल्या तुम्हीही ऑफिसला उशीर होऊ नये म्हणूण 'ओ...भाऊ जरा लवकर चला ना...' असं म्हटलं असेलच.

मीडिया रिपोर्टनुसार एडवर्ड नावाच्या व्यक्तीनं स्वतःच्या नावे हा विक्रम केला आहे.

तो मित्राच्या लग्नासाठी थायलंडला आला होता. त्याचदरम्यान बँकॉक शहर फिरत असताना त्याच्या मनात विश्व रेकॉर्ड बनवण्याचा विचार आला.

त्याच्या रिक्षाचं नाव टुक-टुक आहे. सर्वात वेगवान या रिक्षाचा वेग 119 किलोमीटर प्रतितास आहे.

ही रिक्षा एसेक्स कंपनीनं आणली असून, ही कंपनी यूकेची आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशिअल पेजवर ही माहिती शेअर केली आहे.

या रिक्षाचं इंजिन 1300 सीसीचं आहे. आतापर्यंतच्या रिक्षापेक्षा सर्वात मोठं इंजिन या रिक्षाला लावण्यात आलं आहे.