धोनीने दिली इंडीयन आर्मी शाळेला सरप्राईज भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 05:55 PM2017-11-23T17:55:58+5:302017-11-23T19:24:58+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बुधवारी श्रीनगर येथील भारतीय सैन्य शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत फोटो काढले.

त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना लेफ्टनंट कर्नल (मानद) महेंद्रसिंग धोनी असं म्हणाला की, 'भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झाल्यावर मला भारतीय सैन्यात सेवा करायला आवडेल.'

भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीच्या या सरप्राईज भेटीचे फोटो पोस्ट केले.

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीच्या या भेटीआधी त्याबाबत फार गुप्तता बाळगण्यात आली होती. त्याच्या आणि शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते गरजेचे होते.