न्यूयॉर्कमध्ये 'हॅलोविन डे'ची विशेष तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 12:25 PM2017-10-16T12:25:21+5:302017-10-16T12:28:07+5:30

31 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये हॅलोविन उत्सव साजरा केला जातो.

दैवी किंवा पाशवी अशा कुठल्याच अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व न मानणारे लोकसुध्दा या भुताटकीच्या सोहळ्यात मोठ्या हौसेने भाग घेतात.

न्यूयॉर्कमध्ये या उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. रोषणाईमध्ये भोपळे तयार करून ते शहरातील प्रमुख ठिकाणी मांडण्यात आले आहेत.

१९व्या शतकापासून अमेरिकेत हॅलोविन पार्टीजना सुरुवात झाली. मुलांसाठी ३१ ऑक्टोबर हा हॅलोविन डे म्हणजे जणू मस्तीचा, आनंदाचा आणि चॉकलेटचाही दिवस असतो.

काही लोक या दिवशी दारावर भोपळ्याचे चित्र लावतात तर काही जण काळ्या कपडयातील भयानक मास्क लावलेल्या भुतांना दाराला लटकवतात.

दारासमोर मोठे भोपळे कोरून त्यात मेणबत्त्या लावतात. त्याच्या तेजस्वी प्रकाशात तो भोपळा आकर्षक दिसतो.