गर्भधारणेनंतर 24 वर्षांनी दिला बाळाचा जन्म, गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 10:23 AM2017-12-22T10:23:53+5:302017-12-22T10:25:47+5:30

अमेरिकेतील एका कुटुंबाने 1992 ला गर्भदान केलं होतं. त्या गोठवलेल्या गर्भापासून 24 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला आहे.

मार्च महिन्यात हा गर्भ टिना गिब्सन या तरुणीच्या गर्भाशयात सोडण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात टिना यांनी मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव इम्मा असं ठेवण्यात आलं आहे.

गर्भदान करण्यात आलं तेव्हा टिना यांचं वय फक्त 1 वर्ष होतं. टिना यांचं वय सध्या 26 आहे.

नॅशनल एंब्रियो डोनेशन सेंटर यांनी हे भ्रूण उपलब्ध करून दिलं.