मॉरिशसमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:55 AM2017-09-01T10:55:26+5:302017-09-01T11:11:39+5:30

19 व्या शतकापासून मॉरिशसमध्ये मराठी बांधव स्थायिक झाले आहेत. दोन शतकांनंतरही त्यांनी गणपती प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे.

कोकणातील परंपरेप्रमाणे येथेही डोक्यावरुन वाजत गाजत गणपती आणले जातात. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस)

काही घरांमध्ये गणपती पाच, काही घरांमध्ये सात तर काही घरांमध्ये दहा दिवस गणपती बसविण्यात येतो.

गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक मराठी वेशामध्ये जाखडी नृत्यही येथील तरुण-तरुणी करतात.

मॉरिशसच्या विविध भागांमध्ये आज साधारणपणे सातशे गणपतींची प्रतिष्ठापना होते.

गणेशमूर्तींचे विसर्जनही वाजतगाजत तलावांमध्ये केले जाते. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस)