साता समुद्रापार गणरायाचा गजर, मस्कतमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:11 PM2018-09-25T18:11:21+5:302018-09-25T18:20:43+5:30

आखाती देशांमधील भारताचा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात जवळचा देश म्हणजे ओमान. ओमानमध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गेल्या तीन दशकांपासून मस्कत येथील मराठी मित्र मंडळ गणरायाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करत आहेत.

मस्कतमधील कृष्ण मंदिर सभागृहात दरवर्षी पाच दिवस मस्कतकर मंडळी गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात.

मस्कतमध्ये गणेशोत्सावादरम्यान अथर्वशीर्ष पठण, श्लोक स्पर्धा, महाप्रसाद आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

मस्कतमधील हौशी गायकांच्या 'आठवणीतील गाणी' ग्रुपतर्फे स्वरांजली नावाचा भक्तीसंगीताचा दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

यंदा भारतीय राजदूतांनीही मस्कतमधील गणेशोत्सवास सदिच्छा भेट देऊन कार्यकारी मंडळाचे कौतुक केले.