एमा स्टोन ठरली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 09:06 PM2017-08-17T21:06:27+5:302017-08-17T21:13:22+5:30

सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे.

. 28 वर्षांच्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात 2.6 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 166.4 कोटी रूपये कमावले आहेत.

यावर्षी लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती.

'ला ला लॅंड' सिनेमाने जगभरात जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.