डायना याला म्हणत होती लकी चार्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:34 PM2018-08-31T21:34:42+5:302018-08-31T21:43:28+5:30

मुंबई : ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी प्रिन्सेस डायना हिचे 31 ऑगस्ट 1997 साली फ्रान्समध्ये अपघाती निधन झाले, तेव्हा तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण जग हळहळले होते.

प्रिन्सेस डायना हिने अनेक समाजकल्याणकारी संस्थांबरोबर संलग्न होऊन तिने आपल्या प्रसिद्धीचा वापर, या समाजकल्याणकारी संस्थांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला.

प्रिन्स चार्ल्सशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. डोडी अल फायेद यांच्याबरोबर असलेल्या प्रेमासंबंधांमुळे डायना सर्वांच्या चर्चेत होती.

डायनाच्या बॉडीगार्डने एक खुलासा केला होता की, डायना आपल्यासोबत लकी चार्म म्हणून सेक्स टॉय ठेवत होती.

तसेच, डायनाचा रॉयल प्रोटेक्शन ऑफिसर केन व्हार्फनेही सांगितले होते की, डायनाने 1992 मध्ये सेक्स टॉयची खरेदी केली होती. डायना सेक्स टॉयला 'द गॅजेट' किंवा 'ली गॅजेट' म्हणत होती.

निधन झाल्यानंतर डायनाचा अंतविधी अल्थोर्प इस्टेट येथे करण्यात आला. तत्पूर्वी वेस्टमिन्स्टर अॅबी येथे डायनाला श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जगभरामध्ये अडीच मिलियन लोकांनी पहिले होते.

टॅग्स :लंडनLondon