#DhirubhaiAmbani : यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा धीरुभाई अंबानींची ही ५ वचनं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:59 PM2017-12-28T15:59:05+5:302017-12-28T16:33:47+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी मोध यांच्या कूटुंबात झाला. त्यांचे खरे नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे होते. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त जाणून घेऊया या महान व्यक्तीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

आपल्या कामगिरीतून धीरुभाई अंबानींनी भारतीय उद्योगविश्वाचा चेहरा-मोहरा बदलला. पण सुरुवातीला ते गिरनार येथील पिलग्रीमजवळ भजी विकत असत आणि हीच त्यांची एक व्यावसायीक म्हणून विश्वात झालेली एंट्री होती.

धीरुभाई अंबानी हे व्यक्तिमत्त्व सुशिक्षित नव्हतं तरीही त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वत:चं विश्व निर्माण केलं. ते फक्त दहावी शिकले आणि मग येमेनला गेले.

त्यांनी गॅस स्टेशन अटेंडंट म्हणूनही काम पाहिलंय आणि तेव्हा त्यांना ३०० रुपये पगार होता. त्यानंतर त्यांचा कोट्याधीश होण्याचा प्रवास सुरु झाला.

१९५८ ला येमेनहून परतल्यावर त्यांनी चंपकलाल दमानी या आपल्या चुलत भावासोबत टेक्टाईल ट्रेडींग कंपनी सुरु केली. १९६० ला त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली आणि उद्योगविश्वात आपली सुरुवात केली.