खरेदी करायचीय ? येथून करा भन्नाट शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 05:45 PM2018-11-27T17:45:08+5:302018-11-27T18:23:46+5:30

रविवारी फिरायला जायचंय तर अमेरिकेतील 'बशवीक फ्ली मार्केट' हे खरेदी करणाऱ्यांसाठी बेस्ट पर्याय आहे.

मुंबईतील चोर बझार मार्केट हे देशातील कानकोपऱ्यात नावाजलेलं मार्केट आहे. कमी किंमतीन नो गॅरंटीच्या वस्तू तुम्हाला येथे खरेदी करता येतात.

थायलंडमधील अनेक शॉपिंग मार्केटपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे डॅम्नोईन सडौक फ्लोटींग मार्केट, नौकायानातून खरेदीची भन्नाट मजा.

लंडनमधील पोर्टोबेलो रोड फ्ली मार्केटही खरेदीचा बेस पर्याय आहे. याठिकाणी हजारो शॉप तुम्हाला पर्याय अन् व्हरायटी देतात.

बर्लिनच्या मौरपार्कमधील फ्लोमार्केटला मुख्यत्वे रविवारीच गर्दी पाहायला मिळते, येथे गृहोपयोगी वस्तुंची खरेदी म्हणजे लय भारी.

ग्रीसमधील मोनास्टीरकी फ्ली मार्केट तुम्हाला शॉपिंगची फुल्ल मज्जा देणार, विशेष म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील तरीही तुम्हाला विंडो शापिंगमधून आनंद मिळणार

कॅलिफोर्नियातील रोज बोअल फ्ली मार्केटही खरेदीसाठी मस्त ठिकाण आहे. एका महिन्यात या मार्केटला जवळपास 20 हजार लोकं येथे भेट देतात.